Main Page
From शब्दभांडार
शब्दभांडार
Contents |
सुस्वागतम्
मराठी भाषेतील मुक्त शब्दभांडारात आपले स्वागत आहे. त्यात आपण नवीन शब्दांची भर घालून याची उपयुक्तता वाढवू शकता. शब्दभांडारातील शब्दांची संख्या सध्या ४१३ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास शब्दभांडाराची लवकरच प्रगती होऊ शकेल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद! (सूचना: या प्रकल्पाचे स्वरूप इंग्रजी-मराठी शब्दकोश असे नाही. नेहमीच्या वापरातल्या मराठी शब्दांसाठी 'विक्शनरी हा प्रकल्प आहेच.)
प्रतिशब्द हवे आहेत
Widget, Proxy, Venture Capitalist, Startup, Initial Public Offering, Stock Options, Angel Investor, Backup, [[Period]kalawadhi], Frequency, Remote Sensing, Infrared, Ultra Violet, Topography, Estimate, Estimated, Payload, Telemetry, Tracking, Communication, Photovoltaic, Solar Panel, Cuboid, Parabolic, Antenna, Solar Panel, Area, Propellant, quotation, sales invoice, stop payment, cheque bounce, delivery challan
विभागवार सूची
संगणक विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, व्यवसाय, खेळ, वैद्यकीय, सामाजिक, खगोलशास्त्र, इतर, अज्ञात
नवीन शब्द कसे घालाल?
डाव्या बाजूच्या शोधयंत्रात इंग्रजी शब्द लिहा, आणि "शब्द शोधा" हे बटण दाबा. समजा तो शब्द अजून कुणीही दिला नसेल तर तुम्ही त्या शब्दाचे नवीन पान तयार करू शकाल. समजा आधीच तो शब्द कुणी सुचवला असेल, तर तुम्ही त्या शब्दाचे पान संपादित करू शकाल. संपादनासाठी तुम्ही तुमचे खाते उघडणे आवश्यक आहे. देवनागरी लिहिण्यासाठी सूचना येथे उपलब्ध आहेत.
शब्दसूची
| A | B | C | D | E | F | G |
| H | I | J | K | L | M | N |
| O | P | Q | R | S | T | U |
| V | W | X | Y | Z |
प्रकल्पामागील भूमिका
या भाषेत काळानुरूप नवीन शब्दांची निर्मिती होत नाही, ती भाषा मृत समजावी. मराठी भाषेत विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, किंवा जागतिक राजकारणाविषयी बोलण्याविषयी बरेच शब्द अपुरे पडतात. ती उणीव भरून काढण्यासाठी या प्रकल्पाचे प्रयोजन केले आहे. हा प्रकल्प सर्वांसाठी खुला आहे. विकिपीडिया या प्रसिद्ध स्थळावरती वापरण्यात आलेली मुक्तस्त्रोत आज्ञावली, मीडियाविकी, त्यात वापरण्यात आली आहे. आम्ही आपणा सर्व मराठी भाषाप्रेमींना विनंती करतो, की ह्या शब्दभांडारात नवनवीन संकल्पनांसाठी नवनवीन शब्दांची भर टाकून त्याची उपयुक्तता वाढवावी. स्वत:च नाही तर आपल्या मित्रपरिवाराला देखील याविषयी सांगून त्याची सदस्यसंख्या वाढवा. हे नवीन शब्द सुरुवातीला जरा अवघड किंवा अनैसर्गिक वाटतील, परंतु त्यांचा वापर मराठी अनुदिनीकार (ब्लॉगर्स), मनोगती, आणि मायबोलीकरांनी नियमित सुरू केला की ते नेहमीचेच वाटायला लागतील.
शब्दभांडार मी सध्यातरी माझ्या खाजगी संकेतस्थळावर सुरू केला आहे. समजा हा प्रकल्प लोकप्रिय झाला, तर त्याचे स्वत:चे वेगळे स्थळ तयार करूयात. पण ती पुढची गोष्ट झाली. सध्या ह्या शब्दसंग्रहातील शब्दांची संख्या वाढवून तो उपयुक्त करणे हे आपले उद्दिष्ट अाहे.
