Current events
From शब्दभांडार
नमस्कार
मिलिंद भांडारकरांनी येथे अजून बातम्या देण्याची व्यवस्था केली नाही आणि आताशा त्यांचे इकडे लक्ष कमी आहे तो पर्यंत मी या जागेचा जरा वेगळा उपयोग करतो. जर तुम्ही इथे चुकुन भटकून आला असाल तर मराठी माणसांनो खालील गोष्टींना गांभीर्यानी घेऊ नका, आणि माझ्या स्वप्न रंजनास तुमच्या पूस्त्या जोडण्यास विसरू नका. आणि हा कार्यक्रम घेऊन जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगू शकणार नाही अशाच सूचना येथे लिहाव्यात. अर्थात हा कार्यक्रम राबवण्याकरिता ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हवे त्यांनी आपल्या नावांची नोंद कार्यक्रमा खाली दिलेल्या खास विभागात करावी.
हि सर्व कामे शासनानेच वेगेवेगळ्या समीत्या, महामंडळे शंभर पंचवार्षिक योजना नेमून करावयाची आहेत.
[edit]
माझा मराठी भाषेकरिता राजकीय कार्यक्रम
- मीठ सत्याग्रह; म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हातावर चिमूटभर मीठ ठेवून त्याला विचारणे ,की मीठात आयोडीन कंपलसरी असत तर संगणकावर मराठी फॊंट आणि मराठी कळफलक कंपलसरी का असू नयेत
- सरकारने इंग्रजी-हिन्दी - शब्दांना मराठी शब्द देणारे कॉल सेंटर चालवावे
- मराठीत भाषांतर करून देणार्यांकरिता शहरी रोजगारहमी योजना (चांगल्या भत्त्याची) चालवावी
- प्रत्येक हॊटेल रूम रिसोर्ट्स रूम्स मध्ये मराठी कसे बोलावे याच्या पुस्तिका ठेवणे बंधनकारक करावे
- प्रत्येक टॅक्सी, रिक्षा , बस कंडक्टर यांच्याकडे मराठी कसे बोलावे याच्या पुस्तिका ठेवणे बंधनकारक करावे
- ...इथे तुमची पुस्ती जोडा
- ...इथे तुमची पुस्ती जोडा
- ...इथे तुमची पुस्ती जोडा
- ...इथे तुमची पुस्ती जोडा
