शब्दभांडार:About

From शब्दभांडार

Jump to: navigation, search

( फोटो कॅप्शन :१) उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री.कृष्णरावजी काळे, २) श्री.कृष्णरावजी काळे यांचा सत्कार करतांना परमेष्ठी अनुसया माता रामरोटी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ३) दान केलेल्या जमिनीचे भीमिपूजन करतांना श्री. काळे व उपस्थित इतर मान्यवर.) परमेष्ठी सती अनसुया माता रामरोटी प्रतिष्ठान द्वारा संचालित श्री.कृष्णरावजी काळे वृद्धाश्रमाचे भूमिपुजन व श्री.काळे यांचा सपत्निक सत्कार. परिसरातील उपेक्षित वृद्धांकरीता येत्या एक वर्षात राहण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प. भुमिपुजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. भिष्णूर  : येथील शेतिनिष्ठ शेतकरी म्हणुन परिसरात प्रसिद्ध असलेले श्री.कृष्णराव देवरावजी काळे यांनी परमेष्ठी सती अनसुया माता रामरोटी प्रतिष्ठानाला आपल्या मालकीची दोन एकर शेती वृद्धाश्रमाकरीता दान दिली. या भूमिवर वृद्धाश्रमाची वास्तु उभी करुन परिसरातील वृद्धांच्या निवासाकरीता नरखेड तालुक्यातील एकमेव दानशुर व्यक्ती म्हणुन श्री.काळे यांनी कीर्ती प्राप्त केली आहे यावेळी श्री.काळे यांचा तसेच त्यांच्या पत्नी सौ..राधाबाई कृष्णरावजी काळे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील तरुण मंडळींच्या मनामध्ये दिवसेंदिवस वृद्ध मातापित्यांबद्धलची श्रद्धा ढळत चाललेली आहे. भारतीय संस्कृतीचा जणु विसरच नविन पिढीला होत चालेला आहे याची प्रतीती समाजात येत असल्यामुळे समाजातील वृद्धांना आसरा मिळावा या हेतुने या परिसरातील श्री.काळे यांनी रामरोटी प्रतिष्ठानला आपल्या मालकीची दोन एकर शेती दान केली की जेणेकरुन परिसरातील निराधार वृद्धांना मानाचे जीवन येथे जगता येईल. यावेळी कार्यक्रमाचे संचालन समाज कार्यकर्ते श्री.महादेव बोराडे यांनी केले तर आभार श्री..सुरेश रेवतकर यांनी मानले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नरखेड पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी श्री. भड तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री. शरदराव गेडाम, बालाजी रेवतकर, रामरोटी प्रतिष्ठानचे श्री. वानखेडे, ऍड.श्री.ढाबे महिला प्रतिनिधि म्हणुन सौ. सुनंदाताई पोतदार आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले त्यावेळी समाजातील पाश्चिमात्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण न करता केवळ आपल्या माता पित्यांची सेवाही केली तर परमेश्वराची सेवा केल्याचे फळ प्राप्त होईल या प्रकारच्या विचाराची व भारतीय संस्कृती जतन करण्याची वेळ आपल्या समाजातील जबाबदार व्यक्तींवर आलेली असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात यावेळी व्यक्त केले. सत्कारमुर्ती श्री. कृष्णरावजी काळे यांनी सत्काराला उत्तर देतांना, मी ठरवलेले कार्य केले त्यात माझ्याबद्धल या प्रकारच्या कार्यक्रमाची कसलीही आवश्यकता नव्हती. यावेळी नविन पिढितील तरुणांनी आपल्या माता पित्यांच्या सेवेसोबत आपल्या समाजाच्या ॠणाची जबाबदारी स्विकारुन समाजाचे जे देणे लागते ते कोणत्या ना कोणत्या स्वरुपात द्यायलाच पाहिजे ही भावना समाजात वाढीस लागायला हवी, तसेच सुना-मुले-मुली, यांनी आपल्या घरातिल थोरांना वृद्धांना आदराने सन्मानानेच वागवायला शिकावे हिच इच्छा यावेळी व्यक्त केली.

Personal tools