माहितीपूर्ण लेखन

माहितीपूर्ण लेखांची अट घातल्यावर एखादे संकेतस्थळ कशा लेखनप्रकारांनी भरेल, ह्याचा आम्ही विचार करून हे माहितीपूर्ण लेखन केले आहे. कृपया ह्या संकेतस्थळावर मराठीतील माहितीपूर्ण लेखांच्या अभिलाषेने येणाऱ्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावेत.

एक माहितीपूर्ण लेख:

१. जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय विमानप्रवासापैकी ६०% प्रवास हा युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान होतो.
२. मेक्सिकोतील दूरध्वनी संस्था चालवणारे श्री. कार्लोस स्लिम हे श्री वारेन बफेट ह्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. ह्याबद्दल अधिक माहिती अशी की श्री. बिल गेट्स, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
३. कॉम्प्युटर असोसिएट्स ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय कुमार हे त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अर्थविवरणात केलेल्या घोटाळ्यामुळे कारागृहात जाणार होते, परंतु त्यांनी मांडवली करून सुमारे ८० कोटी डॉलर्स रक्कम देण्याचे कबूल केले आहे.
४. गूगल ह्या संस्थेने डबलक्लिक ही संकेतस्थळांवर जाहिराती चढवणारी संस्था ३१० कोटी डॉलर्सला विकत घेतली आहे.

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘लेखाविषयी’ अशी नोंद करावी.

आता एका माहितीपूर्ण कविता:

विमानप्रवास जगतात होतो
त्यातला साठ टक्के युरोपात येतो (जातो हे यमक आम्ही विडंबनकारांसाठी राखून ठेवले आहे. ह्या येतो चे जातो, असे करून ते सहज विडंबन करू शकतील.)

कार्लोस स्लिम श्रीमंत होतो
आणि वारेन बफेटला मागे टाकतो

संजय कुमार मांडवली करतो
आणि कारागृहात जाणे टाळतो

गूगल ला अधिक पैसा मिळवावासा वाटतो
आणि डबलक्लिक खरेदीचा निश्चय होतो

माहितीपूर्ण कवितेचा प्रयत्न करतो
आणि सर्किट वाचकांचा मार खातो
(विडंबनकारांनी सर्किट ह्या नावाच्या जागी आपले नाव टाकावे, म्हणजे विडंबन अधिक योग्य होईल.)

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘कवितेविषयी’ अशी नोंद करावी.

आता एक माहितीपूर्ण नाटक:

मी: जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय विमानप्रवासापैकी ६०% प्रवास हा युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान होतो.
तो: हो का ?
मी: मेक्सिकोतील दूरध्वनी संस्था चालवणारे श्री. कार्लोस स्लिम हे श्री वारेन बफेट ह्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. ह्याबद्दल अधिक माहिती अशी की श्री. बिल गेट्स, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
तो: हो का ?
मी: कॉम्प्युटर असोसिएट्स ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय कुमार हे त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अर्थविवरणात केलेल्या घोटाळ्यामुळे कारागृहात जाणार होते, परंतु त्यांनी मांडवली करून सुमारे ८० कोटी डॉलर्स रक्कम देण्याचे कबूल केले आहे.
तो: हो का ?
मी: गूगल ह्या संस्थेने डबलक्लिक ही संकेतस्थळांवर जाहिराती चढवणारी संस्था ३१० कोटी डॉलर्सला विकत घेतली आहे.
तो: हो का ? अरे वा ! ही छान माहिती दिली आपण.

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘नाटकाविषयी’ अशी नोंद करावी.

आता एक माहितीपूर्ण नाट्यछटा:

खरंच? वाटलंच होतं मला! जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय विमानप्रवासापैकी ६०% प्रवास हा युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान होतो. काय म्हणता ? जगात सर्वात श्रीमंत लोकच विमान प्रवास करतात ? अहो, माहिती नाही का तुम्हाला की जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस कोण ? अहो, सोपं आहे. मेक्सिकोतील दूरध्वनी संस्था चालवणारे श्री. कार्लोस स्लिम हे श्री वारेन बफेट ह्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. ह्याबद्दल अधिक माहिती अशी की श्री. बिल गेट्स, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. काय म्हणालात ? कार्लोस कुमार? नाही हो, तुम्हाला संजय कुमार म्हणायचं का ? कॉम्प्युटर असोसिएट्स ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय कुमार हे त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अर्थविवरणात केलेल्या घोटाळ्यामुळे कारागृहात जाणार होते, परंतु त्यांनी मांडवली करून सुमारे ८० कोटी डॉलर्स रक्कम देण्याचे कबूल केले आहे. नाही, ३१० कोटी नाही. गूगल ह्या संस्थेने डबलक्लिक ही संकेतस्थळांवर जाहिराती चढवणारी संस्था ३१० कोटी डॉलर्सला विकत घेतली आहे. मी, वृत्तपत्र? अजीबात नाही. तुम्ही ऐकताय तोवर माहिती द्यावी म्हटलं. बरोबर ना?

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘नाट्यछटेविषयी’ अशी नोंद करावी.

आता एक माहितीपूर्ण चर्चाप्रस्ताव:

जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय विमानप्रवासापैकी ६०% प्रवास हा युरोप आणि अमेरिकेच्या दरम्यान होतो. ह्याबद्दल तुमचे मत काय ?
मेक्सिकोतील दूरध्वनी संस्था चालवणारे श्री. कार्लोस स्लिम हे श्री वारेन बफेट ह्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. असे का झाले असावे बरे ? ह्याबद्दल अधिक माहिती अशी की श्री. बिल गेट्स, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ह्याबद्दल तुमचे मत काय ?
कॉम्प्युटर असोसिएट्स ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय कुमार हे त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अर्थविवरणात केलेल्या घोटाळ्यामुळे कारागृहात जाणार होते, परंतु त्यांनी मांडवली करून सुमारे ८० कोटी डॉलर्स रक्कम देण्याचे कबूल केले आहे. हे तुम्हाला योग्य वाटते काय ?
गूगल ह्या संस्थेने डबलक्लिक ही संकेतस्थळांवर जाहिराती चढवणारी संस्था ३१० कोटी डॉलर्सला विकत घेतली आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिदिनाला अशी अभुतपूर्व घटना व्हावी ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘चर्चेविषयी’ अशी नोंद करावी.

आता एक मुक्त संवाद (अर्थातच ललितलेखन):

आमच्या रत्नांग्रीतून पोमेंडिला जाताना शिंची ती यष्टी धादा ष्टापते. म्हणून हल्ली आमचे रामागडी पण विमानातून म्हमईला जातात. पण च्यामारी विमानातून दहातले सहा लोक रामालोक युरोपातून अमेरिकेत जातात हो! आम्ही मात्र यष्टी धरली ती धरली ! आम्ही आमच्या वाडीतल्या नारळाच्या कज्जात गुंतून पडलो नसतो, तर आम्ही शेयरबाजारातले दलाल नस्तो झालो? शिंच्या मेक्सिकोतला तो कार्लोस स्लिम त्या वारेन बफेट (जन्मरास सिंह, लग्नरास कर्क) पेक्षा जास्त मालदार झाला (षष्ठस्थानातल्या मंगळाची किमया बरं का). बिलगेट्स तर सर्वात जास्त मालदार भा*खाऊ. खरां तर त्या संजयने (काम्पुटर आसोशीट का काय म्हणतात त्याचा) जेलात चक्की पिसायला हवी होती. पण ह*मखोराने भरले आपल्या खिशातून ८० कोटी आणि सुटला. आमच्या तात्या भडभुंजाने भरले असते तेवढे पैशे, तर तो पण सुटला नसता का त्या गंगीच्या कज्जातून ? फक्त पदराला हात घातलान अन काय, बसला कोर्टाच्या चकरा टाकत. शिंचे गूगल आणि आमच्या वाण्यात आम्हाला एकच फरक दिस्तो. आमच्या वाण्याने दुसरा वाणी कधीच विकत घेतला नाही. सड्यावरचे एक दुकान चालवत राह्यला चेचेपर्यंत. हे भ*वे एकामागोमाग एक दुसऱ्या वाण्यांची दुकाने घेतांयत विकत. रत्नांग्रीस आपले जाहिरातीचे दुकान चालवून दाखव की रे *ाड्या.

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘ललितलेखनाविषयी’ अशी नोंद करावी.

धन्यवाद, विविध लेखनप्रकार माहितीपूर्ण असू शकतात, हे माझे मत आहे.

आहे ना माहितीपूर्ण ? आपल्या उत्साही प्रतिसादांची वाट पहात आहे. आपल्या प्रतिसादात ‘आपल्या मताविषयी’ अशी नोंद करावी.

One Response to “माहितीपूर्ण लेखन”

  1. शैलेश श. खांडेकर Says:

    :)

Leave a Reply